” शिवडीचे पाहुणे “

मुंबई शहराची लांबलचक किनारपट्टी अनेक समुद्रपक्ष्यांसाठी आश्रयस्थान आहे. ठाण्याची खाडी,एलिफंटा गुंफा, उरण, मड-मानोरी खाडया पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय उत्तम आहेत. परंतु या सर्वांपेक्षा शिवडीचा उपसागर एखाद्या दुपारी आपला श्वास रोखून धरतो. वर्तमानपत्रातल्या फोटोमधून फ्लेमिंगो (रोहित ) पक्ष्यांची डौलदार काया बघितली. गुगलवर त्यांचे मोहक रंग पाहून मी मोहित झालो. त्यांची उडतानाची अदा, त्यांच्या थव्यांच्या विविध नक्षी पाहून त्यांना […]

“ सभ्यतेचा आदर्श- अॅडव्होकेट ए.एच. खतिब “

काही माणसे उच्चपद पावोत वा न पावोत, परंतु ती अशी निराळ्या गुणावाणाची असतात की, त्यांचा समावेश कधीच त्यांच्या समकालीनांत होत नाही. विलक्षण चिवटपणाने कालौघाचा मंद वेग जलद करण्याचा अट्हास करणारे,भूत, वर्तमान, भविष्य अभेदाने पाहणारे, सर्वकाळाचे निःसंग प्रवासी प्रत्येक पिढीत असतात. असतात तिथे विक्षिप्त ठरतात. ध्यासावर त्यांचा विश्वास चालू असतो; एक तर अनावर कष्टाळूपणा; सतत काम […]

“ बनारसी अध्यात्म “

माझ्या सोलो ट्रॅव्हलींच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी माझे बनारस (काशी) ला जाणे झाले. मागे काशी विश्वनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते पण त्यावेळेस बनारस घाट आणि खास करुन नागासाधूना भेटायचे राहून गेले होते. अनेक पौराणिक पुस्तकांमधून नागासाधूंबद्दल ऐकले आणि वाचले होते. त्यामुळे त्यांचे जीवन आणि परमार्थमार्ग जाणून घ्यायचा होता. बनारस मधील एका मित्राच्या सहयोगामुळे नागासाधूंचा वावर असणाऱ्या […]

” अफ्रिकन सव्हाना जंगल “

महाराष्ट्रातील बरीच जंगले पाहिली. त्यांच्या सहवासात ती थोडी थोडी वाचायला शिकलो. एकदा केनियाला जाण्याचा योग आला. केनिया आणि दक्षिण अफ्रीका. विमान नैरोबीशी जवळीक सांगायला लागले तेव्हा शुभ्रधवल मेघांचे तांडे आकाशभर पसरले होते. अनंत निळ्याशार रंगाचे, गहिरे. मुंबईतल्यासारखे पांढुरके, रेशनमधे वाटून दिल्यासारखे, मापाइतकेच बेतून दिलेले नाही, खिडकीच्या गजातून डोळ्यात मावेल एव्हडेच ! हे आकाश इतके प्रशस्त […]

” माझ्या शहराची एक भाषा “

एकविसाव्या मजल्यावरच्या खिडकीवर टकटक झाल्याने मी दचकून पाहिलं. मला काचेपलीकडे मुंडास बांधलेलं डोकं दिसलं. त्याने खुणेने पाणी मागितलं. मी पाण्याची बाटली आणली आणि त्याला देण्याकरता वाकलो. वाकल्यामुळे मला एकदम तो ज्या उंचीवर काम करत होता त्या उंचीची जाणीव झाली. बांबूच्या पंचवीस मजली परातीवर तो काम करत होता. प्रथम बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशात मला त्याचा चेहरा नीट […]

“ संवाद “

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. अत्यंत कमी शिकलेले, जवळ जवळ नाहीच म्हणा ना. पण त्यांचा लोकसंग्रह जबरदस्त आहे. पेशाने गायक असल्यामुळे त्यांचे सतत कार्यक्रम होत असतात. प्रत्येक कार्क्रमात ते सगळ्यांनाच पुढच्या कार्क्रमाचे निमंत्रण देतात. काल अचानक त्यांचा फोन आला. “नये साल की मुबारक बात” असे ते पाच–सहा वेळा म्हणून २०१८ वर्ष संपायला एक महिना बाकी […]

” थेंबभर शिल्लक “

तूच ना सांगायचास मला हसून वेदना वागवायला? तूच ना म्हणायचास सोसून यातना, शिक,दोन थेंब शिल्लक रहायला ! माझ्याच कवितेच्या या ओळी आठवल्या आणि पाठोपाठ समोर आले अशा व्यक्तींचे चेहरे ज्यांनी आयुष्यात खूप काही सोसले आहे आणि तरीही स्वतःला थेंबभर का होईना शिल्लक ठेवले आहे. पहिली आठवली ती माझी डान्सर मैत्रीण. तरुण वयात परजातीच्या एका तरुणाच्या […]