“ बालपण पाखरांसोबतचे “

माझ्या गावातील शाळेची ईमारत बांधली जात होती तेव्हा आमचा इयत्ता सहावीचा वर्ग गावच्या रवळनाथ मंदिरामधे काही महिन्यांकरिता चालत असे. रयत शिक्षण संस्थेची सद्गुरू अनंत महाराज विद्यालय नाते, ता. महाड– रायगड माझी शाळा. तेव्हा त्या देवळासमोर होळीचामाळ आणि तिथे समोरच एक नांद्रुक नावाचा मोठा वृक्ष होता आणि आजदेखील आहे. त्याला मोठा पार होता. या झाडावर सकाळ […]

” श्रावणातला रानमेवा “

शाळेतून परत येताना टाकळा उपटून आण हे आईचे बोल आज आठवले. पावसाळ्यात मोकळ्या ठिकाणी,बांधावर सहजगत्या उगवणारा टाकळा. आजी म्हणत असे, “टाकला (टाकळा कोकणात ‘ळ’ ला ‘ल’ बोलणारे आजूनदेखील बरेच आहेत) तिथं उगवला.“ श्रावण मासात कितीतरी वैविध्यपूर्ण निसर्गदत्त उगवणाऱ्या या भाज्यांमुळे आमचा आहार सकस आणि कसदार असे.. गावची शाळा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी दुपारच्या सुट्टी पर्यंतचं असे. […]

” गळाठीचा झिंगा “

बुधवार आणि आयितवार(रविवार) असला की आजी “तुज्या रातीच्या जेवनाची सोय तूच कर” असा स्वालंबनचा धडा गिरवण्यास सांगत असे आणि मी हाताला काय मासोळी लागते का ह्या इरयाद्याने शाळा सुटली की गळ घेऊन व्हाताळीवर बामनाच्या घाटावर तासनतास बसून मासेमारी करत असे ! गळाने मासे मारण्यासाठी जी साधने  लागतात त्यात एक मेसाची काठी, जिला सटका असेही म्हणतात, […]