” शिवडीचे पाहुणे “

मुंबई शहराची लांबलचक किनारपट्टी अनेक समुद्रपक्ष्यांसाठी आश्रयस्थान आहे. ठाण्याची खाडी,एलिफंटा गुंफा, उरण, मड-मानोरी खाडया पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय उत्तम आहेत. परंतु या सर्वांपेक्षा शिवडीचा उपसागर एखाद्या दुपारी आपला श्वास रोखून धरतो. वर्तमानपत्रातल्या फोटोमधून फ्लेमिंगो (रोहित ) पक्ष्यांची डौलदार काया बघितली. गुगलवर त्यांचे मोहक रंग पाहून मी मोहित झालो. त्यांची उडतानाची अदा, त्यांच्या थव्यांच्या विविध नक्षी पाहून त्यांना […]

” देवनारची नर्सरी “

देवनार येथे एक वन खात्याने सजवलेली नर्सरी आहे. गच्च,गर्द,बकाल वस्ती जवळजवळ शंभर एकरावर पसरलेली. सर्वत्र दुर्गंधी. प्लॅस्टिकच्या पिशव्या,फिल्मचे दिसतात तसे दिसणारे रोल ठायी ठायी अक्राळ विक्राळ स्वरूपात पहुडलेले. असे वाटते ते प्लॅस्टिक त्या परिसराला आणि खासकरून झाडांना खावून टाकेल. हा सर्व झोपडपट्टीचा भाग ओलांडून आतमधे गेलो की वन खात्याने चार एक हजार झाडे लावली आणि […]

CRZ vs DEVELOPMENT

A Regulation like CRZ is a must to protect the coast from anarchical development. All talk of ‘development’ vs. ‘regulation’ or ‘conservation’ is missing the point completely. Development cannot be unfettered and an assessment is necessary before any project meant for development is executed, both with respect to the short term and long term benefits […]

पाऊस चुंबन

पसरुनी हात ढग खालती येई उंचावून टाचा धरती चुंबन देई नभ दिसते नसुनी, असुनी दिसले नाही पाऊस गीत गाते ही काळी आई ! … ©️विनयकुमार खातू

पाऊस चिंत्रांचा

आभाळ झिरपते भरलेल्या माठात अन् काळा माठ बघ भरला आभाळात आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे धारा धारातुन उतरती घनाचे तुकडे गडगडून आले माथ्यावर आभाळ थयथयती मंजुळ पायांतिल लय चाळ काळोख नेसूनि आला वादळवारा ठेउनी आठवण पडून गेल्या गारा ही जुनीच माती ओढी नवं पांघरूण हे जुनेच अंगण ल्याले हिरवं सारवण हे जुनेच ओहळ वाहून […]

” कनकेश्वरचा डोंगर ” ( http://epaper.raigadtimes.co.in/index.php/2018/08/29/raigad-times-29-august-2018/ )

अलिबागला नुसता समुद्र आहे असे नाही. सुंदर डोंगरही आहेत. एकाआड पत्ते लावावेत तसे. कनकेश्वर, सिद्धेश्वर, रामधरणेश्वर. त्यांच्या मधुन धावतात दऱ्या. डोंगरांची मालिका आहे. मला भावणारा कायम बोलावणारा तो कनकेश्वरडोंगर. कनकेश्वर डोंगरावर असणाऱ्या शंकर मंदीराचा इतिहास मला माहित नाही. परंतु समर्थ रामदासांच्या खालील उक्ती प्रमाणे कोणतरी संत महात्मा येथे येऊन आजूबाजूच्या सृष्टी सौंदर्याचं अवलोकन करीत असता […]