“ तो “ कोण आहे ?

‘ आज पुन्हा त्यांनी बाहेर ठेवलेली बादली पळवली. आता हाताला मिळूदेचं, त्याची तंगडी मोडून ठेवते,’ आशाताई वैतागत म्हणाली. गेल्या पंधरा दिवसात दुसऱ्यांदा तिची बाहेर ठेवलेली प्लास्टिकची बादली गायब झाली होती. आज आशाताई इतकी चिडली होती की तिची बादली चोरणारा तिला सापडला असता तर त्याला तिने झोडपूनच काढले असते. ‘ अहो, दोन दिवसापूर्वी आमची बादलीपण गायब […]

“पृथ्वी शॉ- एकलव्याचा वारसदार”

#prithvishawvinaykumarkhatu ( Pleas Note- माझ्या फेसबूक आणि इतर मित्रांच्या आग्रहा खातर मी #पृथ्वी शॉ च्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल हा लेख लिहिला आहे. ह्यामधून मला कोणाचेही मन दुखावण्याचा उद्देश नाही आणि आत्मप्रौढी चा इरादा तर अजिबात नाही. ह्या लेखातून एखाद्या उदयोन्मुख खेळाडूने प्रेरणा घेतली तर माझे लिखाण सार्थक होईल अशी माझी नम्र धारणा आहे ) आपण सर्वश्रुत […]

मला गवसलेले ” गांधी “

महात्मा गांधी एक विश्वव्यापी व्यक्तिमत. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला ह्यांना ते भावले. २००० साली ‘मिलेनियम’ वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमधे लेखक, नेते, शास्त्रज्ञ,कलावंत यांना मागे टाकत आईन्स्टाईन आणि गांधीजी ही दोन नावं उरली. त्यात आईन्स्टाईन ला जास्त मत पडली. तोच आईन्स्टाईन एकदा म्हटला होता, ” गांधींसारखी व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि ह्या भूतलावर चालली […]

“ जंगलातलं भुतं “

नजिकच्या काळात माझे रायगड जिल्ह्यातील एका अभयारण्यात जाणे झाले. तेथिल इनचार्ज असलेले वनअधिकारी माझे चांगले मित्र असल्यामुळे तेथिल वनविश्रामगृहात माझी राहण्याची सोय झाली. जंगलात दौरा करणाऱ्या वन-अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृह बांधलेले असते. ही विश्रामगृहे नदीकाठी किंवा उंच डोंगरावर बांधलेली असतात. तिथून आजूबाजूचं सुष्टी सोंदर्य पाहाता येत. ते वनविश्रामगृह अगदी आतमध्ये जंगलात आहे. तिथे पर्यटकासाठी साधे व वातानुकुलीत […]

“ ती “

ती नेपाळच्या धनगरी जिल्ह्यातील कुठल्यातरी गावातली. नवऱ्याने तिला सोडले चार मुलं गळ्यात टाकून. दोन मुलगे आणि दोन मुली. मुलांना कसबस तिनं वाढवलं आणि मोठया मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. धाकटी दोन मुलं काहीतरी मोलमजुरी करतात तिकडे. घर कसे चालेल ह्या चिंतेने आणि नेपाळपेक्षा चार पैसे जास्त मिळतील ह्या विचाराने ती मुंबईमध्ये तिच्यापेक्षा दहाबारा वर्षांनी […]

“ तो “

तो आजसुद्धा भेटला मला. दर पावसाळ्यात भेटतो. मी पावसाळ्यात मुंबई–गोवा हायवे ने अलिबागला जाण्याऐवजी उरण–करंज्याहून रेवस बंदरावर होडी (तर) ने जाणे पसंत करतो. तो होडीत तिकिट फाडतो. हाफ हाताचा शर्ट,खाली हाफ चड्डी,पायात कधी चप्पल कधी बीनचपलीचा,हातात सिल्व्हर मेटल बेल्टचे घड्याळ. आजपर्यंत तो एकही शब्द बोललेलामला आठवत नाही. मी त्याला मागील पाच वर्षे पाहतोय. केवळ हात […]