पिंपळ

फांद्यांची अडचण होते म्हणून मारझोड करुन कुणीतरी त्याच्या फांद्याच तोडल्या त्या विशाल वृक्षाची छाया हरवली, पक्ष्या–पांथस्थांची सावलीच गेली सगळेच गेले सोडून त्याला तो पुरता खचला जुनी पाने गळता गळता नवे कोंब उमलू लागले अल्लड गुलाबी रंग पानोपानी खुलू लागले बघता बघता तो पुन्हा तरारला घनदाट फांद्या घेऊन पुन्हा सजला पक्ष्या–पांथस्थांची पुन्हा सुरु झाली वर्दळ मलाही […]

“ विभाजन आईचे ”

एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही आणि भावंडांमध्येही मी एकटाच. एकदा थकल्या आवाजात आई म्हणाली होती तुला एखादा भाऊ हवा होता म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता बस्स इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून त्याची आई कुठे दिसली नाही घरात सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी […]

गळफास –

ते सरकार म्हणतं; आमच्या राजवटीत पासष्ट वर्षात शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याचा दर होता कमी हे राजरोस आत्महत्या प्रकरण तुमच्यापासून झालं सुरु.. हे सरकार म्हणतं; एकत्रीत आत्महतेची प्रकरणं तुमच्या राजवटीतली आमच्या पाच वर्षाच्या काळात फक्त एकट्याने झाडाला लटकून फास घेणं झालं सुरु… ते सरकार काय अन् हे सरकार काय दोघंही एकाच माळेचे मणी दोघांनी मिळून रचलेय आजपर्यंत […]

“ सभ्यतेचा आदर्श- अॅडव्होकेट ए.एच. खतिब “

काही माणसे उच्चपद पावोत वा न पावोत, परंतु ती अशी निराळ्या गुणावाणाची असतात की, त्यांचा समावेश कधीच त्यांच्या समकालीनांत होत नाही. विलक्षण चिवटपणाने कालौघाचा मंद वेग जलद करण्याचा अट्हास करणारे,भूत, वर्तमान, भविष्य अभेदाने पाहणारे, सर्वकाळाचे निःसंग प्रवासी प्रत्येक पिढीत असतात. असतात तिथे विक्षिप्त ठरतात. ध्यासावर त्यांचा विश्वास चालू असतो; एक तर अनावर कष्टाळूपणा; सतत काम […]

“ बनारसी अध्यात्म “

माझ्या सोलो ट्रॅव्हलींच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी माझे बनारस (काशी) ला जाणे झाले. मागे काशी विश्वनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते पण त्यावेळेस बनारस घाट आणि खास करुन नागासाधूना भेटायचे राहून गेले होते. अनेक पौराणिक पुस्तकांमधून नागासाधूंबद्दल ऐकले आणि वाचले होते. त्यामुळे त्यांचे जीवन आणि परमार्थमार्ग जाणून घ्यायचा होता. बनारस मधील एका मित्राच्या सहयोगामुळे नागासाधूंचा वावर असणाऱ्या […]

” अफ्रिकन सव्हाना जंगल “

महाराष्ट्रातील बरीच जंगले पाहिली. त्यांच्या सहवासात ती थोडी थोडी वाचायला शिकलो. एकदा केनियाला जाण्याचा योग आला. केनिया आणि दक्षिण अफ्रीका. विमान नैरोबीशी जवळीक सांगायला लागले तेव्हा शुभ्रधवल मेघांचे तांडे आकाशभर पसरले होते. अनंत निळ्याशार रंगाचे, गहिरे. मुंबईतल्यासारखे पांढुरके, रेशनमधे वाटून दिल्यासारखे, मापाइतकेच बेतून दिलेले नाही, खिडकीच्या गजातून डोळ्यात मावेल एव्हडेच ! हे आकाश इतके प्रशस्त […]

” माझ्या शहराची एक भाषा “

एकविसाव्या मजल्यावरच्या खिडकीवर टकटक झाल्याने मी दचकून पाहिलं. मला काचेपलीकडे मुंडास बांधलेलं डोकं दिसलं. त्याने खुणेने पाणी मागितलं. मी पाण्याची बाटली आणली आणि त्याला देण्याकरता वाकलो. वाकल्यामुळे मला एकदम तो ज्या उंचीवर काम करत होता त्या उंचीची जाणीव झाली. बांबूच्या पंचवीस मजली परातीवर तो काम करत होता. प्रथम बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशात मला त्याचा चेहरा नीट […]