“ तो “

तो आजसुद्धा भेटला मला. दर पावसाळ्यात भेटतो. मी पावसाळ्यात मुंबई–गोवा हायवे ने अलिबागला जाण्याऐवजी उरण–करंज्याहून रेवस बंदरावर होडी (तर) ने जाणे पसंत करतो. तो होडीत तिकिट फाडतो. हाफ हाताचा शर्ट,खाली हाफ चड्डी,पायात कधी चप्पल कधी बीनचपलीचा,हातात सिल्व्हर मेटल बेल्टचे घड्याळ. आजपर्यंत तो एकही शब्द बोललेलामला आठवत नाही. मी त्याला मागील पाच वर्षे पाहतोय. केवळ हात […]

” आरशातला माणूस “

मायकल जॅक्सनचे ‘Man in the Mirror’ गाणे आज बऱ्याच दिवसाने ऐकले. किती अर्थपूर्ण आणि बोलके आहे त्याचा प्रतेय गाडीत एकटाच ते ऐकताना आला आणि दुःखी मनावर फुंकर घालण्यासाठी, हरलेल्या,गिल्ट मधे असणाऱ्या जीवनाला आरशातील माणूस बदलून नव्याने जगता येण्याचा एक धडा मिळाला– “आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते !!” “Change the […]

आणि दुःख confuse होतं….

त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी “आनंद” असं लिहितो ….आणि दुःख confuse होतं येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छानशी smile देतो ….आणि दुःख confuse होतं खरं सांगायचं तर खूप वेळा मी कोलमडून जातो सगळं संपलं असं वाटून अगदी गर्भगळीत होतो कुठूनतरी देव येऊन माझ्या हातात त्याचा हात देतो ….आणि दुःख confuse होतं संकटाच काय? ती येणारच आल्यावर थोडं […]

“ बालपण पाखरांसोबतचे “

माझ्या गावातील शाळेची ईमारत बांधली जात होती तेव्हा आमचा इयत्ता सहावीचा वर्ग गावच्या रवळनाथ मंदिरामधे काही महिन्यांकरिता चालत असे. रयत शिक्षण संस्थेची सद्गुरू अनंत महाराज विद्यालय नाते, ता. महाड– रायगड माझी शाळा. तेव्हा त्या देवळासमोर होळीचामाळ आणि तिथे समोरच एक नांद्रुक नावाचा मोठा वृक्ष होता आणि आजदेखील आहे. त्याला मोठा पार होता. या झाडावर सकाळ […]

” पेहराव “

काही दिवसांपूर्वी मी आणि पृथ्वी (भारतीय विश्वविजेत्या अंडर 19 संघाचा कॅप्टन आणि पर्दापणात रणजी आणिईराणी चषकात शतक झळकावलेला,आपिएल गाजवलेला भविष्यातील भारतीय क्रिकेट मधील सितारा. ज्याचे सोबत माझे वडील–मुला सारखे नाते सर्वंश्रुत आहे) जुहू चौपाटीवर भर पावसात चिखलामधे फूटबॉल खेळत होतो. संपूर्ण चिखलाने माखून गेलो होतो.अगदी कपडयापासून ते केसामध्ये वाळू आणि चिखल चिकटलेला होता.पृथ्वीने त्याची सॅक […]

“जगण्याचे नाविण्य”

गावातील नावाजलेले किराणामालाचे दुकान मे. श्रीराम/मनोहर खातू अँड कंपनी …. दुकानात लागणारे सर्व सामान मोठे काका महाड मधील घावूक विक्रेत्यांकडून आणतं. सामान त्याकाळात नव्याने आलेल्या रिक्षा टेम्पोने आणलजायी. काका सामान आणायला गेले आहेत हे दुपार पर्यंत समजून गेलेले असे. मग आम्ही बच्चे कंपनी टेम्पो कधी येतोय त्याची वाट पहात दबा धरून बसलेलो असायचो.कारण गावातील होळीच्या […]

“वलगनीचा शिवडा”

वलगन’ हा शब्द कोठून कसा अस्तित्वात आला आणि त्याचा नक्की अर्थ काय हे मला अद्यापही माहित नाही. किंबहुना मी त्या भानगडीत पडत देखिल नाही. परंतु दरवर्षी न चुकता माझ्या गावच्या गांधारी नदीला जी रायगड किल्ल्याजवळ उगम पावते आणि पुढे सुप्रसिद्ध सावित्री नदीला भेटते ( भेटणे म्हणजे गळाभेट अर्थानेच मिळते ऐवजी भेटते लिहिले आहे). पुर आला […]