” शिवडीचे पाहुणे “

मुंबई शहराची लांबलचक किनारपट्टी अनेक समुद्रपक्ष्यांसाठी आश्रयस्थान आहे. ठाण्याची खाडी,एलिफंटा गुंफा, उरण, मड-मानोरी खाडया पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय उत्तम आहेत. परंतु या सर्वांपेक्षा शिवडीचा उपसागर एखाद्या दुपारी आपला श्वास रोखून धरतो. वर्तमानपत्रातल्या फोटोमधून फ्लेमिंगो (रोहित ) पक्ष्यांची डौलदार काया बघितली. गुगलवर त्यांचे मोहक रंग पाहून मी मोहित झालो. त्यांची उडतानाची अदा, त्यांच्या थव्यांच्या विविध नक्षी पाहून त्यांना […]

” देवनारची नर्सरी “

देवनार येथे एक वन खात्याने सजवलेली नर्सरी आहे. गच्च,गर्द,बकाल वस्ती जवळजवळ शंभर एकरावर पसरलेली. सर्वत्र दुर्गंधी. प्लॅस्टिकच्या पिशव्या,फिल्मचे दिसतात तसे दिसणारे रोल ठायी ठायी अक्राळ विक्राळ स्वरूपात पहुडलेले. असे वाटते ते प्लॅस्टिक त्या परिसराला आणि खासकरून झाडांना खावून टाकेल. हा सर्व झोपडपट्टीचा भाग ओलांडून आतमधे गेलो की वन खात्याने चार एक हजार झाडे लावली आणि […]

“पक्षी आणि आपण “

ना घर मेरा ना घर तेरा दुनिया रैन बसेरा ! माझा मित्र माजी क्रिकेटर संजय मांजरेकर ह्यांच्या पक्षी निरीक्षणाच्या छंदामुळे तो अलिबाग आणि इतरत्र भेटीअंती माझ्याशी नवनवीन पक्षांबद्दलबोलत असतो. त्याच्या सहवासामुळे मला पक्षी निरीक्षणाचा छंद जडला आहे. ह्या छंदापोटी मुंबई असो अगर कुठेही फिरत असताना मी सभोवताली दिसणाऱ्या, फिरणाऱ्या पक्षांचे मागिल काही वर्षे निरीक्षण करीत […]

“ बालपण पाखरांसोबतचे “

माझ्या गावातील शाळेची ईमारत बांधली जात होती तेव्हा आमचा इयत्ता सहावीचा वर्ग गावच्या रवळनाथ मंदिरामधे काही महिन्यांकरिता चालत असे. रयत शिक्षण संस्थेची सद्गुरू अनंत महाराज विद्यालय नाते, ता. महाड– रायगड माझी शाळा. तेव्हा त्या देवळासमोर होळीचामाळ आणि तिथे समोरच एक नांद्रुक नावाचा मोठा वृक्ष होता आणि आजदेखील आहे. त्याला मोठा पार होता. या झाडावर सकाळ […]