एक विचार पुनर्भेटीचा-

प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही व्यक्तींना, काही आठवणींना हृदयाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. काही वेळेला आपल्या सहवासात आलेल्या अशा व्यक्ती काही कारणांमुळे आथवा परिस्थितीमुळे आपल्यापासून दुरावतात. कधी एखाद्याचा अकाली मृत्यु घडतो तर कधी काळाच्या ओघात आपण एकमेकांपासून दूर होतो

मी असाच सहज बसलो असताना माझ्या मनात एक विचार आला की, समजा आपल्याला कोणी विचारले की तुझ्या आयुष्यातील अशा कोण व्यक्ती आहेत ज्यांना तुला पुन्हा भेटायला आवडेल ? हा प्रश्न मनात आला आणि तात्काळ माझ्या डोळ्यांसमोर काही व्यक्तींचे चेहरे आले. माझ्या नकळत माझ्या ओठावर हसू फुटले. असे वाटले की खरोखरच या व्यक्तींशी पुनर्भेटीचा क्षण माझ्या आयुष्यात पुन्हा यावा. मी विचार करायला लागलो, किती व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत, ज्यांना मला पुन्हा भेटायला आवडेल आणि काय आश्चर्य सात आठ नावे तर सहज डोळ्यासमोर आली.

काही माणसे पुन्हा भेटावीशी वाटतात, कारण त्यांच्याशी आपले असलेले नाते कुठेतरी अपूर्णच राहून गेले असते. कधी गैरसमजाने तर कधी मनीच्या दुराव्याने प्रेम असूनही आपल्याला एकमेकांशी मोकळे होता येत नाही. अशावेळी या दुरावलेल्या माणसांना पुन्हा भेटावेसे वाटते, सगळे सांगावेसे वाटते. एकमेकांना दिलेल्या वेदना अश्रूंनी धुऊन टाकाव्या वाटतात आणि आपल्यातील प्रेम कसे उदात्त आहे याची ग्वाही द्यावीशी वाटते. अशीही काही माणसे असतात आपल्या जपलेल्या आठवणीत.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी खास माणसे असतातच, अनमोल क्षण असतात. प्रत्येकाने अशा माणसांचा किंवा अशा अनोख्या प्रसंगांचा खजिना सतत जवळ ठेवावा आणि तो पुन्हा पुन्हा उघडून पहावा त्यामुळे जीवनात आनंद निर्माण करता येवू शकतो. विचार करा आपण जर अशा प्रत्येकावर लिहायचे ठरवले किंवा हयात असणऱ्या व्यक्तींना प्रयत्नपूर्वक भेटून दुरावा मिटवता आला तर किती बरे होईल..

..विनय खातू (३.४.१९)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s