“पृथ्वी शॉ- एकलव्याचा वारसदार”

#prithvishawvinaykumarkhatu

( Pleas Note- माझ्या फेसबूक आणि इतर मित्रांच्या आग्रहा खातर मी #पृथ्वी शॉ च्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल हा लेख लिहिला आहे. ह्यामधून मला कोणाचेही मन दुखावण्याचा उद्देश नाही आणि आत्मप्रौढी चा इरादा तर अजिबात नाही. ह्या लेखातून एखाद्या उदयोन्मुख खेळाडूने प्रेरणा घेतली तर माझे लिखाण सार्थक होईल अशी माझी नम्र धारणा आहे )

आपण सर्वश्रुत आहोत महाभारतामधील एकलव्याची कथा काय होती. गुरुविना कसा तो धनुर्विद्या शिकला आणि पारंगत झाला. स्वतः एखादी कला अवगत करण्याकरता जी चिकाटी , जिद्ध, एकाग्रता आणि मेहनत लागते. ती सर्व माझ्या अंडर १९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा कॅप्टन आणि आता भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ मध्ये ठासून भरली आहे आणि म्हणून हा मुलगा मला एकलव्याचा वारसदार वाटतो. असे बोल्ड स्टेटमेंट करत असताना पृथ्वीलालहानपणापासून ज्यांनीज्यांनी क्रिकेटचे आणि खासकरून बॅटींगचे धडे दिले त्यांना कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही. त्या सर्वाना त्यांच्या काँट्रीब्युशन करता खास करून आमदार संजय पोतनीस साहेबह्यांनी त्याची रहायची सोय करून केलेली खूप मोठी मदत या सर्वाना आदर देवून मला ह्या बॅटधारी एकलवयाचा जगजेत्ता आणि कसोटी क्रिकेटरहोण्या पर्यतच्या प्रवासातील सर्वातमहत्वाची बाब म्हणजे त्याचेउच्च दर्जाचे तंत्रयावर प्रकाश टाकावा वाटतो.

पृथ्वी मला दहावर्षाचा असताना मुंबईतील सांताक्रूझ येथील एयर इंडिया मैदानावर भेटला. पहिल्या भेटीतच त्याचे नैसर्गिक तंत्र टायमिंग पाहून मी थक्क झालो होतो. एक केवळ दहा वर्षाचा थोडासा गुबगुबीत पण चुणचुणीत मुलगा ज्या पद्धतीने हरएक प्रकारचे शॉट्स लिलल्या खेळत होता ते पाहून माझा त्याला पहिला प्रश्न होता, बेटाआपके कोच कौन है ? आणि त्याचे उत्तर होते, मेरे पापा सिखाते है ! म्हणून मी त्याच्या वडीलांबद्धल चौकशी केली असता समजले की त्याचे वडील ना कोच आहेत ना कुठल्याही लेव्हल चे स्पर्धात्मक क्रिकेट ते खेळले आहेत. दोन दिवसानंतर पृथ्वी त्याच्या वडिलांची माझ्या घरी एकत्रित भेट झाली पृथ्वीला क्रिकेटर होण्याच्या प्रवासात सर्वोतपरी सहाय्य करण्याच्या इराद्याने एक ऋणानुंबंधाचीगाठ बांधली गेली.

मागील सहा ते सात वर्षे पृथ्वीच्या असामान्य बॅटींग टेक्निक बद्दल त्याच्या माझ्या मधे अनेक वेळा तासंतास चर्चा झाली आहे. त्याच्या वडिलांकडून त्याने पाचव्या वर्षी पहिल्यांदा हातामध्ये सिझन ची बॅट धरली आणि एक क्रिकेटर होण्याच्या द्रुष्टीने त्याचा प्रवास सुरु झाला. त्या प्रवासामधे अनेक कोच त्याला लाभले त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शनकरून त्याच्यातील बॅटींग स्किल अधिक चांगले केले या बाबत माझ्या अगर पृथ्वीच्या मनात तिळमात्र शंका नाही. परंतु ज्या पिढीतून पृथ्वी येतो त्यामध्येक्रिकेट कोचयाची एक विस्तीर्ण अत्यंत महत्वाची अशी फार मोठी परिभाषा आहे. कोच त्यांच्या स्टुडंटला बॅट ची ग्रीप धरण्यापासून, त्याचा स्टान्स,बॅकलिफ्ट ,फुटवर्क , ड्राइव्ह करताना शरीराचा समतोल सांभाळणे ह्या बॅटींगटेक्निक बाबतच्या सर्व गोष्टी गिरवून घेत असतो. कोच त्या मुलासोबत नेट सेशन पासून ते रात्रं दिवस उपलब्ध राहून त्या लाहानच्या मुलाच्या छोटया क्रिकेट विश्वातल्या बारीकसारिक अशा सर्व प्रश्नांची समाधानपूर्वक उत्तरे देण्याच्या प्रयत्न करत असतो. आजच्या मॉडर्न युगात झपाट्याने बदलणाऱ्या आणिअतिवेगवान अशा स्पर्धात्मक क्रिकेटमधे टिकून राहून यशस्वी होण्याकरिता अतिआवश्यक असा फिटनेस डाईट या बाबत बहुमोल असे मागदर्शन कोच करत असतो. काय खावे ,काय खावू नये, कुठल्या पद्धतीचा व्यायाम लाभदायक ठरू शकतो या बाबत सखोल चर्चा करून वर्कआऊट शेड्यूल डाईट चार्ट बनवून त्याचे एकझीक्यूशन करण्याचे काम कोच करत असतो. स्टॅमिना बिल्ट होण्यासाठी नवनवीन योजना एक्झिक्युट करतो आणि सर्वात महत्वाचे त्याचा गुरु,मित्र मार्गदर्शक म्हणून सदैव सोबत असतो. आचरेकर सर होते ज्यांनी सचिन तेंडुलकरला बॅटींग टेक्निक शिकवले, भरपूर वेळ दिला. जास्तीत जास्त मॅचेस सचिन कसा खेळेल यावर भर दिला. स्वतःच्या स्कुटरवर पाठीमागे बसवून शिवाजी पार्क, आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि वेळ पडल्यास पुन्हा एमआयजी अशा वेगवेगळ्यामैदानावरती दिवसामधे नेट सेशन उपलब्ध करून दिले. आणि जगालासचिन तेंडुलकर ‘’सारखानभुतो भविष्यतीअसा लेजेंड दिला. तिच कहाणी विराट कोहली त्याचे कोच श्री. शर्मा यांची, तशीच जोडी रोहित शर्मा कोच दिनेश लाड यांची आणि तशीच अजिंक्य रहाणे त्याचे कोच माजीकसोटी पट्टू प्रवीण आंबरे यांची.

माझ्या पृथ्वीच्याबाबतीत अशी गुरु शिष्याची ठोस जोडी अधोरेखित करता येत नाही. विरार मधील पहिली क्रिकेट अकॅडमी ,रिझवी स्कूल ,एमआयजीक्लब , आणि भारतीय अंडर १९ संघ या प्रवासाच्या दरम्यान नक्कीच बऱ्याच सन्माननीय कोचनीत्याला बहुमोल मार्गदर्शन केले. परंतु वर उल्लेखित कोचच्या परिभाषेतील व्यक्ती ह्या एकलव्यास प्राप्त झाली नाही हे सत्य नाकारता येणार नाही. आणि ह्या एका बाबीमुळे पृथ्वी बद्दल चे माझे प्रेम, आदर अभिमान दिवसेंदिवस वृद्धिगंत होतो. तासंतास माझ्या सोबत युट्युब वरती सचिन, द्रविड, गावस्कर ,स्टीव्ह स्मीथ विराट कोहली यांची बॅटींग चे बारीक निरीक्षण करत बसणेहा त्याचा जिमला जातायोतानाचा नेहमीचा उपक्रम . जिमच्या अगोदरच, सर मोबाइल का बॅटरी फूल चार्ज करके रखो ! हे फर्मान त्याने सोडलेले असे.

एखादा स्ट्रोक मारण्यात काही चूक होत असल्यास बीकेसि मधे एमसिए क्लब मधे जाऊन बॉलिंग मशीनवरती ३०० ते ४००एकाच टप्प्यावरील बॉल्स फेस करणे आणि तो शॉट रेक्टिफाय करणे अशी त्याची मेहनत. हा मुलगा वेगवेगळ्या कोचेस नी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारावरती बॅटिंग शिकत आला, क्रिकेट शिकत आला आपला आपण अचाट मेहनतीने गिरवूनगिरवून तंत्र विकसित करीत आला आहे. त्याच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा चिकाटी दिसते.

येथे अवर्जून उल्लेख करावा लागेल तो त्याचे वडील पंकज यांचा. ज्यांनी अहोरात्र कष्ट मेहनत करून पत्नी च्या निधनानंतर पुनर्विवाह करता त्यांचा संपूर्ण वेळ त्यांनी पृथ्वीच्या क्रिकेट साठी डेडिकेट केला. माझ्या मते आजच्या काळातील कोच ने जो वेळ स्टुडन्टसाठी द्यायचा असतो ती भूमिका पंकज यांनी पूर्ण केली आहे. मला त्यांचा मित्र म्हणून घेण्यात मनस्वी आंनद आहे.

मी पूर्ण समाधानी आहे की मी पृथ्वीच्या जीवनात येऊन त्याचा फिटनेस डायट याचे काउंसिलिंग करून, तासंतास चर्चेअंती फिटनेस टारगेट्स आखण्यात हातभार लावला. त्याच्या प्रचंड मेहनतीनंतर मुंबई आणि अलिबागच्या घरी त्याला रिलॅक्ससेशन देण्यास मला वेळ देता आला. त्याच्या एकाग्रतेसाठी मेडिटेशन आणि योग ह्याचे महत्व पटवून देऊन त्याच्याकडून ते करून घेता आले. त्याच्या सर्व प्रश्नांना माझ्यापरीने उत्तरं देता आली. त्याच्याबरोबर सिनेमा पाहून मस्त मजा करता आली. आणि जिममधे त्याला मसल बिल्डिंग करताना वैतागलेला पाहता आले. कितीतरी आनंदाचे, त्रासाचे, नैराशेचे क्षण सोबत जगता आले. ह्या माझ्या छोट्या भूमिकेबाबद मी पूर्ण समाधानी आहे. त्याचे पाय कायम जमिनीवर राहावे त्याकरता मी त्याच्याशी कायम सवांद साधेनचं. पण आता तो स्थिरावेल. तो मोठा झालाय त्याला आता माझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. त्याला आता एक्स्पर्ट गायडन्स जास्त उपयोगी ठरेल हे मी पूर्णपणे ओळखून आहे. माझे आणि त्याच्या वडिलांचे जुजबी ज्ञान आता पुरेसे नाही. मला त्याच्या यशाचा वाटेकरी होण्यास कोणतेही स्वारस्य नाही. नैसर्गिकरित्या फुलून आलेल्या ह्या नात्यास कोणतेही नाव देता त्याला फुलातना, बहरताना आणि यशाची शिखरें गाठताना फक्त डोळेभरून पाहायचे आहे. आता पृथ्वीची योशोगाथा तूर्तास बंद करून दुसरा एखादा पृथ्वी वाट पाहतोय का ? ते हेरायचे आहे

केवळ देवाकडे माझे मागणे असेल की महाभारतामधील एकलव्यास मेनस्ट्रीम मधे येता आपला पराक्रम गुरूच्या पुतळ्यास दाखवावा लागला. ह्या पृथ्वी नामक त्याच्या वारसदाराने मात्र २०१९ चा विश्वचषक खेळावा टीम इंडिया मधील त्याची जागा पक्की करावी आणि आपले नाव क्रिकेट इतिहासामधे अजरामर करावे.

..विनयकुमार खातू (.१०.१८)

#Prithvi Shaw– The Descendant of Eklavya

We all are aware of the story of Eklavya from the Mahabharata. How he learnt to become an expert archer without learning it from any teacher. The kind of dedication, concentration, perseverance and hard work required to gain any kind of skill, is present in my Prithvi Shaw, the Under 19 World Cup winning team Captain and Indian Test cricket team member, to the fullest and hence I feel he is a descendant of Eklavya. I am making this bold statement, not to hurt the feelings of all those people who have helped him since childhood to become a good cricketer and batsman but to show how hardworking he has been. I would like to pay my respects to all those people who have contributed towards his success, I admire MLA Mr Sanjay Potnis for providing him place to live in Mumbai,that was the biggest help, however more light should be thrown on the journey of this ‘Batsman Eklavya’ and how his high quality technique is the most important aspect to be considered.

I met Prithvi when he was 10 years old and was playing on the Air India Ground in Santacruz, Mumbai. In the first meeting itself I was surprised by his natural technique and timing in playing cricket. A just 10-year-old, slightly chubby but highly energetic boy could play all range of shots very easily, was a bit of a surprise and my first question to him was “Who is your coach?” And his answer was “My father teaches me”. Then I enquired about his father and found out that he was neither a coach by profession nor had he played any matches in his time. But he is certainly a die heart fan of cricket and alway wanted his son to become a cricketer. After 2 days I met both Prithvi and his father together at my house and I decided to help him fulfill his dream of becoming a cricketer. Somewhere we connected on a very personal level after that meeting.

In the last 6-7 years Prithvi and me have discussed his unique batting technique for hours together. I got to know from his father that when Prithvi was just 5 years old, he got his first cricket bat and that is where his journey towards becoming a cricketer began. During this journey, he was guided by multiple good coaches and they imparted valuable guidance to him to improve his batting skills and both of us Prithvi and me have no doubts that, that guidance has proved to be beneficial. However, the generation that Prithvi belongs to, in this generation a cricket coach has an extensive and very important definition. A coach is supposed to guide the student in how to grip a bat, his stance, backlift, footwork, balance in the body when playing a drive and many more such techniques. These techniques need to be practiced on a daily and regular basis with the help of the coach. The coach is supposed to be with the student from net practice session to day night practice session. He should be a part of the small cricketing world of the student and should be available to answer to the small and large questions satisfactorily. In this modern world of competitive cricket, which is constantly changing and with high speed, it is required that the student stays at pace with this speed and gets the correct fitness and diet counselling from the coach. What to eat, what not to eat, what kind of exercise will be most beneficial is to be deeply discussed and a workout schedule and diet chart needs to be made by the coach and made sure that it is implemented. The coach finds out new methods to build the stamina of the student and most importantly he has to be the teacher friend and guidance at all times.

Achrekar Sir taught Sachin Tendulkar batting technique, gave him a lot of time, he made sure that Sachin played maximum matches and made him sit on his own scooter and took him to Shivaji Park, Azaad Maidan, Cross Maidan and if required back to MIG in a day, just to make net sessions available for him. The world got “The God of Cricket” because of Achrekar sir. Same story is about Virat Kohli and his coach Mr. Sharma, Rohit Sharma and his coach Dinesh Lad and Ajinkya Rahane and his coach former cricketer, Pravin Ambre.

I cannot underline such a teacher student pair for my Prithvi. He started his journey from Virar’s first cricket academy, then Rizvi school, MIG Club, CCI Club and the Indian Under 19 Team. During this journey he has been guided by many talented and respectable coaches, however there is no such coach who will be put into the definition like the coaches mentioned above for the well known top cricketers. Hence I call him Eklavya, who is more or less self taught and for this reason the love, respect and pride I feel for him is growing day by day. His daily activity while going and coming back from the Gym is to watch YouTube videos of Sachin, Dravid, Gavaskar, Steve Smith and Virat Kohli’s finer details of batting techniques, with me. Before going to the gym, he orders me to keep my mobile battery fully charged.

If he faults in hitting some kind of shot, he will go to BKC and face 300-400 similar kind of shots from the bowling machine and will rectify his shot. This boy has been learning his batting technique and cricketing technique based on the teachings of various coaches and has been practicing these with extreme hard work and has been developing his own unique style. He has a completely different energy level, perseverance level and spark, which is unique. Here I would like to specially mention Prithvi’s father Pankaj, who has equally worked very hard along with Prithvi and dedicated all his time and attention to his cricketing dream. I feel the kind of time and dedication a coach has to give to his student, Prithvi’s father has given him.

I am very happy on the fact that I am a part of his life and have been helping in his counselling for diet and fitness and with deep discussions have helped him set a target. After his extreme hard work, I can give him relaxation time and have made him realize the importance of medication to improve on his concentration. I am satisfied with the small role I play in his life. I will make sure he remains rooted to the ground always and his hunger for more and more runs never goes out. I will be in constant discussion about these topics with him in order to become a good human being. So far my role should be given a stop here. I don’t want to become partner in his success. It’s all his hard work. No credit should be given to anyone apart from his hard work and his father’s sacrifices. I can not advise him now with my insufficient cricketing knowledge and he needs experts now. I just want to see him achieving many more milestones. I would rather choose to stay away and find out any other Prithvi to work on !!

I will always pray to god that like Eklavya from Mahabharata, who could not come into Mainstream and had to show his skill to a mud statue of his teacher, Prithwi should not be like that and should play the 2019 World Cup and make his confirmed position in the Indian Cricket Team. He should set a new history in the world of Indian Cricket and his name should be written in golden letters.

..Vinaykumar Khatu(8.10.18)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s