” बाप्पाचा आशिर्वाद ” #रायगड टाइम्स 19.9.18 http://epaper.raigadtimes.co.in/index.php/2018/09/18/raigad-times-19-september-2018/

आज जाण्यापूर्वी बाप्पा मला भेटला,

जरा वैतागलेला वाटला..

दोन क्षण दम खातो

म्हणून नदीकिनारी टेकला.

उंदीर कुठे पार्क करू ?

लॉट नाही सापडला

मी म्हटले सोडून दे,

आराम करू दे त्याला.

तू पण ना देवा, कुठल्या

जगात राहतोस ?

मर्सिडीजच्या जमान्यातसुद्धा

उंदरावरून फिरतोस ?

मर्सिडीज नाही, निदान

nano तरी घेऊन टाक

तमाम देव मंडळींमध्ये

थोडा भाव खाऊन टाक.

इतक्या मागण्या पुरवताना

जीव माझा जातो

भक्तांना खुश करेपर्यत

खूप खूप दमतो.

काय करू आता

माझ्याने manage होत नाही

पूर्वीसारखी थोडक्यात

माणसे खुशही होत नाहीत.

immigration च्या requests ने system झालीये hang

तरीदेखील संपत नाही

भक्तांची रांग.

पाचदहा रुपये देऊन

काय काय मागतात

माझ्याकडच्या files

नुसत्या वाढतच राहतात.

माझं ऐक तू

कर थोडं थोडं delegation

management च्या theory मध्ये

मिळेल तुला solution.

M.B.A. चे फंडे कधी

शिकला नाहीस का रे ?

Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे ?

असं कर बाप्पा

एक Call Center टाक

तुझ्या साऱ्या दूतांना

एकएक region देऊन टाक.

बसल्याजागी कामं होतील,

तुझी धावपळ नको

परत जाऊन कुणाला,

दमलो म्हणायला नको.

माझ्या साऱ्या युक्त्यांनी

बाप्पा खुश झाला

एक वर देतो बक्षीस,

मागहवं ते म्हणाला

CEO ची position,

Townhouse ची ownership

immigration देखील होईल

झटपट मग duel citizenship.

मी हसलो उगाच,

म्हटलं खरंच देशील का सांग ?

अरे मागून तर बघ,

थोडी देणार आहे टांग ?

पारिजातकाच्या सड्यामध्ये

हरवलेलं अंगण हवं

सोडून जाता येणार नाही,

असं एक तरी बंधन हवं.

हवा आहे परत

माणसातला हरवलेला भाव

प्रत्येकाच्या मनात थोडा

मायेचा शिडकाव.

देशील आणून मला

माझी हरवलेली नाती ?

नेशील मला परत

जिथे आहे माझी माती?

इंग्रजाळलेल्या पोरांना

थोडं संस्कृतीचं लेणं

आईबापाचं कधीही

फिटणारं देणं ?

कर्कश्श वाटला तरी हवा

ढोलताशांचा गजर

भांडणारा असला तरी चालेल,

पण हवा आहे शेजार.

यंत्रवत होत चाललेल्या माणसाला

थोडं आयुष्याचं भान

देशील का रे देवा,

यातलं एक तरी दान ?

नुसता सोंडेमागून हसला बाप्पा

तथास्तुनाही म्हणाला

सारं हाताबाहेर गेलंय पोरा,

सुखी रहाम्हणाला. . . .

©️विनयकुमार खातू

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s