आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन् काळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे
धारा धारातुन उतरती घनाचे तुकडे
गडगडून आले माथ्यावर आभाळ
थयथयती मंजुळ पायांतिल लय चाळ
काळोख नेसूनि आला वादळवारा
ठेउनी आठवण पडून गेल्या गारा
ही जुनीच माती ओढी नवं पांघरूण
हे जुनेच अंगण ल्याले हिरवं सारवण
हे जुनेच ओहळ वाहून नेती होडी
मन माझे चढू पाहते पावसाची शिडी !!
… ©️विनयकुमार खातू