” तो “

जगायचे कसे ? हे शिकावे लागते. त्यासाठीच सारी शास्त्रे नि तत्वज्ञाने झगडताहेत. जीवन हा संग्राम आहे नि तो यशस्वी व्हावा यासाठी मानव अखंड प्रयत्नशील असतो. त्यासाठी कर्तृत्व लागते. गुण लागतात. परिस्थितीही लागते. पण मारायचे कसे हे कुठे आपल्या हातात असते तर त्याचा अभ्यास करायचा ? असे कुणालाही वाटेल. पण जगायचे नीट म्हणजेच मारायचे नीट असे चोख गणित असते. नाहीतरी मृत्यू अटळ असल्याने त्याला धैर्याने सामोरे जाण्यासाठीच तत्वज्ञाने जन्मास आली. मग ती कितीही जीवनाभिमुख असोत. बौद्ध तत्वज्ञान तर उघड मरणाभिमुख आहे. देह भंगुर आहे. क्षुद्र आहे. मरण अटळ आहे. तेव्हा जीवनातले दुःख टाळायचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे या नश्वरतेचा विचार करायचा. देहाच्या विनाशाच्या विविध अवस्था स्मरायच्या आणि मग निर्वाण म्हणजे मानवी अस्तित्व कायमचे लोपेल कसे याचाच ध्यास धरायचा. हे अनेकांना विफलतेचे तत्वज्ञान वाटते पण हे तत्वज्ञान जगाला देणारा बुद्ध मूर्तिमंत शांती होता. सुहास्य होता. देहाने परमसुंदर होता. तीच गत भूताप्रेतांबरोबर स्मशानात राहणाऱ्या सदाशिवाची. मग मृत्यू अटळ आहे याची जाणीव ठेवून त्याच्या स्वागताला सदैव सिद्ध असणे हा जीवनविषयक दृष्टीचाच एक भाग होत नाही का ?

सारे संत हेच सांगतात. शास्त्रज्ञ हसतमुखाने धाडस पत्करतात. जीवन अधिक सुकर सुंदर व्हावे म्हणून ते हे बलिदान आनंदाने स्वीकारतात.

परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मृत्यूचे ध्यान करून त्याला आनंदाने मिठी मारणाऱ्या व्यक्ती क्वचितच दिसतात. त्यातली एक मी पहिली, “तोया व्यक्तीचे नाव शंकर अप्पा. वाकोला सांताक्रुज येथे मिलिटरी कॅम्प च्या रसत्यवर एक ढगळ कोट घातलेला म्हातारा बसायचा. जवळ औषधांच्या पुड्या असायच्या. मोफत औषधें देणे आणि एरवी अध्यात्मचिंतन करणे हेच त्याचे जीवन. वरळीला एका तंबाखूवाल्याच्या ओसरीवर तो राहायचा. तो सदा हसतमुख. औषधेही सोपी आणि साधी. म्हणायचामाझ्या औषधांनी गुण आला नाही , तरी अपाय नक्कीच नाही.” आणि ते खरेच ! सर्व प्रकारच्या वात विकारांवर दोनदा आळूची भाजी खावी. खोकल्यावर लसणीचा मुरंबा खावा. लहान मुलांचा घसा खवखवतो, त्यावर खजूर शिजवून साखर घालून चाटावा, विषमज्वरावर सोळा कप पाणी आटवून एक कप करून ते चमचा चमचा घ्यावे असे त्याचेउपचार. पूर्वी तो रेल्वेत नोकरी करायचा. वडील वारल्यावर तो या नादाला लागला.

एकदा तो दादरला चालला असताना बसचा धक्का लागून पडला.पाय दुखावला तेव्हा तो म्हणालाआबा शंकरशेट म्हणतात, तू फार उड्या मारल्यास. आता नीट एका जागी बस आणि मरणाचा अभ्यास कर.” म्हणून तोमहिनाभर मरणाचा अभ्यास करीत बसला.

हळूहळू चेष्टामस्करी गेली. बोलणे कमी झाले. पण चेहरा गंभीर पण समाधानी होत गेला. एकदा तो जवळच्या माणसांना म्हणाला,” उद्या सकाळी मी असणार नाही.” ते म्हणणे कुणाला खरेही वाटेना नि खोटेही वाटेना पण त्याच्यावर निष्ठा असणारे समजून चुकले की त्याचे इच्छामरण जवळ आले. तो रात्री नेहमी प्रमाणे झोपला , पण सकाळी मात्र नेहमीप्रमाणे उठला नाही.मरणाचा अभ्यास करता करता त्याने सांगूनसवरून जीवनाला निरोप दिला.

मी काही अध्यात्मवादी नाही. परंतु मला एक गोष्ट उमगली की मरणाचाही अभ्यास जीवननिष्टेला करावा लागतो आणि त्याचे एक स्वरूप म्हणजेत्यानेकरून दाखवलेले मरणाच्या अभ्यासाचे प्रात्यक्षिक.

#life#and#death#on#road

…. ©️विनयकुमार खातू

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s