” आरशातला माणूस “

मायकल जॅक्सनचे ‘Man in the Mirror’ गाणे आज बऱ्याच दिवसाने ऐकले. किती अर्थपूर्ण आणि बोलके आहे त्याचा प्रतेय गाडीत एकटाच ते ऐकताना आला आणि दुःखी मनावर फुंकर घालण्यासाठी, हरलेल्या,गिल्ट मधे असणाऱ्या जीवनाला आरशातील माणूस बदलून नव्याने जगता येण्याचा एक धडा मिळाला

आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं ते !!”

“Change the person in the mirror, and your world will change”

आरशातील व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा आपण माफी आणि कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा असमाधानाची, असंतुष्टेची, निराशेची आणि मी एवढा/एवढी काही चांगला/चांगली नाही या सगळ्या भावना संपूर्णतः नाहीशा होतात. आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्तिथी गायब होते. कारण आपल्या माफीची आणि कृतज्ञेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपण स्वतः असतो.

आपल्या आयुष्यात आपण अनके चुका करत असतो. त्यामुळे अनेक वाईट प्रसंग, मानहानी, नैराश्य आपल्यावर ओढवते. आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते आणि आपण स्वतःला कोसत बसतो. स्वतःला गुन्हेगार ठरवून आपण नैराशेच्या गर्तेत अडकून पडतो. फ्रसट्रेशनडिप्रेशन ने जगणे असह्य होते. गिल्ट मधे अडकून राहून सतत मी असे का केले?माझ्याकडून ही चूक का झाली ? हे प्रश्न स्वतः विचारात आपण पूर्ण नकारार्थी होऊन जातो. नाकारात्म विचारानं सर्व गोष्टी आणि सभोवतालची परिस्तिथी,माणसे सर्व सर्व नकारात्मक वाटू लागते. आपण जिथं जिथं जातो तिथं तिथं आणि आपण ज्या ज्या गोष्टी करतो तेव्हा ह्या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी आपल्याबरोबर येतात आणि ज्या ज्या गोष्टीला आपण स्पर्श करतो त्या गोष्टी डागाळून टाकतात. एकामागून एक प्रश्न आपला पाठलाग करतात आणि आपण त्या प्रश्नानंमधे गुंतून पडतो

मला एक प्रयोग करायचा आहे. मला आरशासमोर उभं राहून आरशातल्या त्या व्यक्तीला माफ करायच आहे. त्यानं केलेल्या चूकांकरता पूर्णतः आणि शेवटचे एकदा सर्व चुका आणि दोषांसह माफ करायचं आहे. आरशातल्या त्या व्यक्तीकडे असणाऱ्या चांगल्या गुणांचं स्मरण करून, त्या व्यक्तींन केलेल्या चांगल्या कृत्याची आठवण आरश्यातल्या व्यक्तीला करून देऊन सांगायचे आहे की तू माफीस पात्र आहेस. झाल्या चुका सोडून दे. स्वतःला कोसणे बंद कर.. you really deserve forgiveness ! आरशातल्या व्यक्तीला सांगायचे आहे तू जसा आहेस तसा स्वीकार स्वतःला, टीका करणे बंद कर स्वतःवर.. तुला नव्यानं एक चांगलं जीवन जगायचं आहे ! तुला एक पूर्णतः वेगळा माणूस बनायचंय..

आरशातला तो माणूस बदलायचाय. तो बदलला तर जग बदलून जाईल !!

©️विनयकुमार खातू

One thought on “” आरशातला माणूस “

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s