” पेहराव “

काही दिवसांपूर्वी मी आणि पृथ्वी (भारतीय विश्वविजेत्या अंडर 19 संघाचा कॅप्टन आणि पर्दापणात रणजी आणिईराणी चषकात शतक झळकावलेला,आपिएल गाजवलेला भविष्यातील भारतीय क्रिकेट मधील सितारा. ज्याचे सोबत माझे वडीलमुला सारखे नाते सर्वंश्रुत आहे) जुहू चौपाटीवर भर पावसात चिखलामधे फूटबॉल खेळत होतो. संपूर्ण चिखलाने माखून गेलो होतो.अगदी कपडयापासून ते केसामध्ये वाळू आणि चिखल चिकटलेला होता.पृथ्वीने त्याची सॅक उघडली तर बीसीसीआय एचआर डीपार्टमेंट आणि त्याचे असिस्टंट कोच यांचेदहा फोन कॉल येऊन गेले होते. त्याने ताबडतोब कॉल बॅक केल्यावर समजले की त्याचे श्रीलंका दौऱ्याचेरात्री साडे अकराला जाणारे विमान रात्री आठ वाजता निघणार आहे. आणि पाच वाजेपर्यंत एअरपोर्टला रिपोर्टींग करायचे आहे. त्याच्या पोटात गोळा आला. कारण त्याने त्याच्या सर्व बॅट्स नॉकिंग आणि ऑयलिंग साठी विरारला पप्पू भाईकडे दिल्या होत्या. पप्पूभाई संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बॅट्स घेऊन येणार होता. दुपारचे बारा वाजले होते. मी लागलीच पृथ्वीला रिलॅक्स केले आणि आम्ही ठरवले बांद्रावरूनलोकलने विरार गाठायचे.माझ्या गाडीने विरार वरून वेळेत परत येणे मुश्कील होते. त्याच चिखलाने माखलेल्या अवस्थेत आम्ही फर्स्ट क्लासची तिकिटे काढून ट्रेन मध्ये चढलो. शनिवार असल्यामुळेट्रेनला गर्दी होती. कुणाला आमच्या माखलेल्या अवस्थेचा त्रास नको आणि डब्यामध्ये घाण नको म्हणून आम्ही दरवाज्यामध्ये उभे होतो. आम्ही दोघांनी पाहिले की सर्वजण आमच्याकडेच पहात आहेत. जणूकाही कोणतरी झोपडपट्टी मधील मुले चुकून फर्स्ट क्लासमध्ये चढलेत. सर्वांच्या नजरा रागाच्या होत्या. पृथ्वी थोडा चिडचिड करत होता. अठरा वर्षाचा ग्लॅमर बॉय. त्याला त्या नजरा त्रासदायक वाटत होत्या. मी त्याला दुर्लक्ष कर म्हणून सांगितले.बांदऱ्यावरून अंधेरी स्टॉप गेला आणि सहप्रवाशापैकी एकानेसंयमाचा बांध फोडला आणि मला उद्देशून म्हटलेये तो बच्चा दिख रहा है , तुमको अक्कल नही क्या फस्ट क्लासमे चढे हो अगले स्टेशन पर उतर जाओ और बगल के डिब्बे मे चढो I” मला आता हसावे की रागवावे कळेना. मी पृथ्वीचा हाथ दाबून त्याला रिऍक्टहोवू दिले नाही आणि म्हटले, ठीक है भाई देखता हू।पण पुढील बरीच स्टेशन गेली आणि आम्ही दोघे सर्वांकडे दुर्लक्ष करीत राहिलो. मिरारोड गेल्यावर टीसी आला आणि त्या भाईसाहबने त्याला सांगितले की ही दोन घाणेरडी मुलं फस्टक्लास मध्ये चढलेत. टिसीने तिकीट मागितले आणि मी पेश केले. तोपर्यंत गम्मत पहाण्यास आसुसलेल्या फस्टक्लास टापटीप सहप्रवाशांचा फज्जा उडाला. पृथ्वीला हसू आवरले नाही आणि तो म्हणाला, क्या भाई लोग फूटबॉल खेलके आये है हम। त्यावर तो भाईसाब आणि काही लोक पटकन म्हटले, फीर बताना चाहियेना तिकट है I मी म्हटले आपको क्यू बताउ ? टिसी को बतायेंगे ना I तर तो भाईसाब म्हणतो, बडा आया मॅराडोना I मग मात्र मला रहावले नाही आणि, सर्वानी जरा इकडे लक्ष द्या असं मराठीमध्ये सूचित केले आणि म्हटले, मॅराडोना महान होता पण महान होऊ घातलेल्या या मुलाला ओळखता का ? काही दिवसापूर्वी देशाला अंडर १९ वल्डकप जिंकून देणारा,पर्दापणात रणजी आणि ईराणी चषकात शतक ठोकणारा, वयाच्या तेराव्या वर्षी हॅरीश शिल्डमध्ये ५४६ धावांचा वल्ड रेकॉर्ड करणारा ? मग निरखून पाहिल्यावर दोनचार जण पुटपटले आरे ये तो पृथ्वी शॉ है I अचानक त्या रागावलेल्या नजरा कुतुहलाच्या झाल्या, काहींनी टाळ्या वाजवल्या. मळलेल्या कपड्यानीशी सेल्फी काढण्याचा काहींना मोह आवरला नाही. सॉरी पण बोलले. आणि वातावरण एकदम फुलले.

कसे असते ना ? पेहराव , तुमचे दिसणे, तुमचे वागणे, ड्रेसच्या आतील माणूस आणि त्याचे गुण पोषाकाखाली दडपून जातात.

वरील प्रसंगाला विनोदाची झालर देऊन मी आणि वयाच्या तेराव्या वर्षांपासून सतत ग्लॅमर मध्ये असणाऱ्या पृथ्वीने मजेशीर अनुभव घेतला खरं ! पण त्या निमित्ताने काही गोष्टी मला समजावून गेल्या ……जीवनातला विनोद व्यवहाराच्या वाटचालीतूनच जन्माला येतो.विसंगती, विरोध,उपहास आणि काहीतरी आगळे यातून व्यहाराचे स्वरूप दिसते. ते मोठे मजेशीर असते.

पोशाख सभ्य असावा,स्वच्छ असावा ,नीटनेटका असावा ही कल्पना तर सर्वमान्यच आहे. गौतम बुद्धाने श्रमणांची वस्त्रेसांगितली आहेत. ती खरे पाहता उकिरड्यावरच्या किंवा स्मशानातल्या चिंध्यापाध्या जोडून धुवून रंगवून केलेली असत. त्यांची शिवण आणि जाडकाम भाताच्या शेतासारखे सुबक असावे असे बुद्ध म्हणे. या श्रमण वस्त्रात देखील नेसताना नीटनेटकेपणा असावा असा बुद्धाचा कटाक्ष असे. तेव्हा वस्त्रकसे तरी नेसावे ,ही कल्पना बुद्धालाही अमान्य होती. वस्त्रातला नेटकेपणा मान्य नसूनही त्याने वस्त्रातला नेटकेपणा ओळखला होता. साधेपणाचा गौरव शोभिवंतपणाला काटशह श्रमणच देऊ शकतो.

गृहस्थी व्यवहारात तर अलंकरणालाच प्राधान्य असते. वस्त्रावरून माणसाची इभ्रत जोकली जाते.

पण गांधी नावाचा एक माणूस उदभवला आणि त्याने कपड्यातल्या रईसी छानछोकीला पार धुडकावले. ती गांधी टोपी,तो खादीचा डगला वगैरे परिधाने त्याने महावस्त्रांसारखी थोर करून सोडली,भारदस्त कपड्याच्या शौकिनांना त्याचे वाईट वाटले असेल. ‘बाळसंतोषकरता झबलेअशी खादीच्या सदत्ऱ्याची संभावना श्री..ची केळकरांनी केली होती. पण राजकारणात खादीची इभ्रतवाढल्यामुळे अजून खादीधारी आपला पोशाखी डौल राखू शकतात.

राखत नाहीत आपल्यासारखे. आजकाल बाजारपेठात पोटाला सुखकर असे कसदार अन्न दिसणे दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे . आजकाल फॅशनेबल कपडे मोठया मनमोहक धाटणीतआबालवृद्धांना आकर्षित करताहेत.कपड्याच्या दुनियेत तोटा नाही . या देशात मुलांना पैसे खर्चूनही शुद्ध दूध मिळणे कठीण आहे,पण पेहराव मात्र आकर्षक, सदाचा आकर्षक.

आणि त्या पेहरावावरून माणसाची पारख हे समीकरण पक्क झालं आहे. गरीबश्रीमंत, जातधर्म, शिक्षण, ज्ञान ओळखण्याचे सर्वमान्यमाध्यम म्हणजे तुमचा पेहराव ! मी मुस्लिमासारखा अगर ख्रिस्तचना सारखा पेहराव केला की माझा तो धर्म झाला आणि या उलट मुस्लिमाने धोतर नेसले तर त्याला हिंदू समजण्यास हरकत काय ती ? पण संत चोखामेळा खाली म्हणतात त्याप्रमाणे पेहरावाखाली माणूस आणि त्या माणसाचे गूण तपासण्यास कुणाला वेळ आणि रस ?

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा

काय भुललास वरलिया रंगा !!

असो पण त्या दिवशी मुंबई लोकल च्या कृपेने पृथ्वीला वेळेत धार लावलेल्या (नॉकिंग) बॅट्स कलेक्ट करत्या आल्या आणि ऎपोर्टवर पोहचता आले. त्याला पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची निळी जर्सी घालून शतक ठोकताना पाहून त्या तमाम फस्ट क्लास सहप्रवाशांच्या मनात त्याचा चिखलाने माखलेला टीशर्ट येवून पुन्हा कुणाला विनाकारण पेहरावरून कमी लेखण्याच्या वृत्तीला लगाम लावावा वाटले असेल अशी माझी धारणा आहे..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s