“संयमाचा कोंडमारा”( http://epaper.raigadtimes.co.in/index.php/2018/08/06/raigad-times-6-august-2018/ )

आत्या तिच्या तीन मुलीसह गावाला न चुकता मे महिन्याची सुट्टी लागली की येत असे.आम्ही सर्व भावंडे खुप दंगा मस्ती करत असू. ते सुट्टीचे दिवस कधीच संपू नये असे वाटत असे. पण मे महीना संपत असे आणि आत्याच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होत असे. मुंबईत जोगेशवरीमध्ये राहणारी माझी आत्या. तिला जाताना आजी कडधान्य,पापड,मसाला असे गावचे घरी बनवलेले पदार्थ बांदून देत असे . आत्याला मुंबईला जाण्यासाठी दोन दिवस असताना आम्हाला रडू कोसळत असे पुन्हा एक वर्षांनी भेट होणार म्हणून. आणि शेवटी तो दिवस उगवला की सकाळीच सर्व बॅगा,सामान भरून रिक्षा मधून महाड स्टँडला एस.टी.बस ला सोडण्यासाठी छोटे काका जात असत. आदल्या रात्रीपासून ते आत्या आणि तिच्या मुली जाईपर्यंत आत्या, आजी आणि आम्ही मुले रडून रडुन नाक लाल करत असू. आत्याला आणि बहिणींना रिक्षात बसून जाताना पाहणे खूप कठीण होत असे.

तिच्या मुलींचे आजी,काका सर्व मोठे पापा घेत आणि आजी सतत “काळजी घे छाया पोरीचा घर सासरीच”असे सांगून आत्याची समजूत काढत बसलेली असे. आमच्या डोळ्या देखत रिक्षा मध्ये बसून आत्या आणि तिच्या मुली निघून जात. मी आजीच्या डोळ्यातील पाणी पहात कितीतरी वेळ त्या रिक्षाच्या दिशेने बघत बसून राही. आत्या जाताना वडील व काका पोचल्यावर खुशालिचे पत्र पाठव असे वारंवार सांगत असत !

आणि साधारण दहा दिवसांनी मुंबईवुन पोस्टाने साध्या पोस्टकार्डवर आत्याचे पत्र येई ….

अमुक अमुक तारखेला इस्माईल युसुप स्टॉपवर संध्याकाळी वाजता गाडी सुखरूप पोहचली. हे नायला आले होते. मुलींनी प्रवासात त्रास दिला नाही. राणी थोडी रडत होती. सुखेंळी खिंडीत तीने उलटी केली. बाकी सर्व खुशाल आहे तुमची सर्वांची आठवण येते. सर्व मोठ्यांना नमस्कार , लहानांना पापा. आजीला त्रास देऊ नका खूप अभ्यास करा …….

हे पत्र हातात मिळाले की वाचून दाखवताना बहिणीसोबत केलेल्या गमती जमती स्मरून मन एकाकी होत आहे.

मोठ्यांना मात्र खुशालीचे पत्र मिळाल्यामुळे आनंद होत असे. आपल्या डोळ्या देखत बहीण व मुलगी मुंबईला निघून जाते.त्यानंतर दहा दिवसांनी तिची खुशाली समजते. “हा कुठला संयम?”

आज माहेरून सासरी जाणारी मुलगी गाडीत बसल्यावर फोन करते. गाडी मिळाली, गाडी सुटली, माणगाव ला पोहचली, माणगाव ते पेण ह्या एक सव्वा तासाच्या अंतरात मुलीचा फोन आला नाही तर आई नाहीतर बाप नाहीतर भाऊ तिला फोन करून विचारतो कुठपर्यत पोहचलीस. साधारण

महाड ते मुंबई ह्या चार ते पाच तासाच्या प्रवासात किमान दहा फोन कॉल आणि दहा मेसेजेस पाठवून झालेले असतात. नवऱ्याचा कॉल आला की सेल्पि घेऊन विंडो सीट मिळाली आहे ह्याची खात्री दयायची असते. काहीवेळा तर व्हिडिओ कॉल लावून सत्यता तपसावी लागते.

हे वारंवार कॉल आणि मेसेजेस काळजीपोटी असतात ,खात्रीपोटी की कशापोटी हे ते मोबाईल, व्हाट्सअप्प, व्हिडिओ कॉलची क्रांतीच जाणो !

किती सुंदर,सरळ,साधे विश्वासाचे आणि संयमाचे जीवन होते मोबाईल पूर्वी. पत्राने खुशाली समजणे.त्या पत्रात जणू त्या व्यक्तीचा सुगंध दरवळायचा. एक पत्र अनेक वेळा वाचत बसावे.

अतीतातडीच्या वेळेस त्याकाळात ट्रकॉल द्वारे कळवत. ते सुद्धा दोन ते तीन मिनिटात. त्या पत्राची जागा एसएमएस आणि आता इमेल, व्हॉट्सअपने घेतली. “पत्र कुठेतरी हरवून गेले आहे” अन त्या पत्रासोबत ती माया, जिव्हाळा ,आपलेपणा ,श्रद्धा, संयम विरून गेला.

नवनवीन तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीसाठी जेवढे लाभदायक ठरले आहे ते तेवढेच अंतरीच्या भावना, आपलेपणा आणि खासकरून संयम संपुष्टात आणण्यास जवाबदार ठरले आहे असे म्हटल्यास

वावगे ठरणार नाही. बायको अथवा मुले घरात यायला उशीर झालातर फोन का केला नाही साधा मेसेज पाठवू शकत नाही का? असा काळजी चा सूर नातेसबंधामधील आवश्यक असणारी ‘स्पेस ‘ मारून टाकत आहे काय ? vatलोकेशन पाटव असे दरडावून स्वतःची खोटी समज काढाव्यात? आठवा ते दिवस ,,,,,दिवस दिवस भर उन्हाळ्यात भटकंती करण्याचे ,नदीवर पोहण्याचे,आंबा,फणसाचा दिवसात अमराईत भटकण्याचे ,करवंद काढत डोगरावर रानावनात फिरण्याचे अन मासेमारी करत स्वैर रमण्याचे आठवा ते दिवस’मैत्रीण सोबत सिनेमाला जाण्याचे लंगडी, लपाछपी, भातुकलीचे खेळखेळत कोणाच्यातरी मांडीवरती लपून बसण्याचे आठवा ते दिवस सहलीचे आणि कुठेतरी दहा पंधरा दिवस मनसोक्त हवा पलटायला जाण्याचे ना मोबाइलचा त्रास ना मेसेज ना ईमेल ना लोकेशन ची भीती.

हरएक नात्यामध्ये मग ते पालक आणि मुलाचे असो नवरा बायकोचे असो भावा बहिणीचे असो,मित्राचे असो,बॉस सोबतचे असो अगर नोकरचाकरा सोबतचे असो संयमाचा कोंडमारा होत चाललाय.व्हिडिओ कॉल ,लोकेशन ने खोटे बोलता येणार नाही अशी समजूत होत चाललेय आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर करूत खोटे कस बोलता येईल ह्याचाच विचार जास्त होत असतो.

फेसबुक, व्हाट्सअप्प च्या सुलसुठाणे दुसऱ्याच्या वयक्तिक आयुष्यात विनाकारण डोकावण्याची एक वाईट सवय आपसूकच प्रत्येकाला जडलेय.

वर्षानुवर्ष अथक प्रयत्नाने काही भव्यदिव्य करावे पुस्तक लिहावे चित्र काढावी,शारीरिक प्रयत्नाचा जोरावर शरीर संपदा कमवावी खेळामध्ये माहीर व्हावे,अगर आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक कमवावा ह्यासाठी लागणारा संयम कमी होत चाललाय.सर्व काही फास्ट झाले पाहिजे.

व्हाट्सअप्प वर पाठव ,व्हिडिओ पाठव आणि तो एकावेळी अनेक ग्रुपवर जाणे मग कोणतीही खातरजमा न करता प्रतिक्रियाना ऊत येने, मग कुणाकडे आहे संयम खरेखोटे तपासायची?

मला आयुष्यात पहिल्यांदा केलेला फॅक्स आठवतो.पेजरचा पहिला मेसेज आठवतो मोबाईल वरून केलेला पहिला एसएमएस आणि कॉल आठवतो आणि व्हाट्सअँप चा पहिला मेसेज आठवतो पुढे जावून हे सर्व माझा संयम निकामी करून मला यंत्रमानवा सारखा बटन दाबून कृती करण्यास प्रवृत्त करेल हे माहीत असते तर देवाकडे हे कधीच नको अशीच मागणी केली असती.अन सरळ शेतीवरून झाडा माडामध्ये राहून साधे सर्व विश्वासाचे आणि संयमाचे जीवन जगणे इष्ट समजले असते!!पण आता भावनिक होऊन जगताना निसर्ग,प्राणी पक्षी ह्यांच्याकडून बरच काही शिकत संयमाचे”महत्व पटायला लागले आहे मला तरी प्रयत्नपूर्वक संयमाचा कोंडमाऱ्यातून स्वतःला मुक्त करण्याचा वाटेवरचा वाटेकरू व्हायचे आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s